देशाच्या विकासात काँग्रेसचा वाटा मोठा व इंदिराजींचे कार्य महान : महेंद्र ब्राम्हणवाडे

89

– जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने इंदिरा गांधींना अभिवादन

गडचिरोली :  जिल्हा काँग्रेसस कमिटी गडचिरोलीच्या वतीने भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. देशाच्या विकासात काँग्रेसचा वाटा मोठा असून त्यात इंदिराजींचे कार्य महान आहे. गरीबांसाठी निर्णय घेत असताना 20 कलमी योजना पासून तर बँकांच्या राष्ट्रीयकरण्यापर्यंत अनेक खम्बीर निर्णय घेऊन सामान्य लोकांचा त्यांनी विचार केला तर दुसरीकडे सद्याची मोदी सरकार त्याच बँकां व अन्य शासकीय संस्थांंचे खाजगीकरण करून गरीब जनतेवर अन्याय करत असल्याने या देशाला परत काँग्रेस विचाराची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
यावेळी माजी न. प. अध्यक्ष तथा जि. प. स. अँड. रामभाऊ मेश्राम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, माजी जि. प.अ. सोमय्या पशुल्ला, महासचिव समशेरखा पठाण, प्रदेश महासचिव सोशल मीडिया नंदूभाऊ वाईलकर, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, बाळासाहेब आखाडे, नगरसेवक रमेश चौधरी, आशीष कांबळी, सुभाष धाईत, जितेंद्र मुनघाटे, सुनील चडगुलवार, ता.अ. नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, घनश्याम वाढई, रुपचंद उंदिरवाडे, नामदेव उडाण, गोपाल आंबोरकर, प्रभाकर कुबडे, आबाजी आंबोरकर, गौरव येनप्रड्डीवार, चारुद्दत पोहणे, नंदू कथले, अजय भांडेकर, विपुल एलट्टीवार, कल्पना नंदेश्वर, लताताई मुरकुटे, मयूर गावतुरे, नीता वडेट्टीवार, वर्षा गुलदेवकर आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.