पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत बिरसा मुंडा जयंती साजरी

157

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती सोमवारला उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, अधीक्षिका एल. आर. शंभरकर यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक वृंदांच्या भाषणासह वनश्री कुमरे, शिवानी पोटावी, क्रिष्टी एक्का आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षक व्हीं. एम. नैताम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षक डॉ. एस. डी. गोट्टमवार, व्ही. एस. देसू , व्ही. के. नैताम यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन पोटेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत करण्यात आलेले आहे.