– राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
गडचिरोली : लग्न समारंभ जोडतांना वधु-वरांचे परिचय होणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलामुलींना असं वाटते कि आपल्याला चांगले स्थळ मिळाले पाहिजेत. आजचा युग ऑनलाईन आहे, पण आँँनलाईन नाते जोडल्या जात नाही. जोपर्यंत वधु-वरांचे विचार जुडत नाही तोपर्यंत नाते जुडत नाही. तेली समाज हा मोठा समाज असल्याने तेली समाजाला वधु-वर परिचय मेळाव्याची आवश्यकता आहे. आपल्या समाजाला मोठे करायचे असेल तर समजाविषयी दृष्टीकोन मोठा असावा, असे प्रतिपादन स्थानिक शिव-पार्वती मंगल कार्यालयात राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परीचय मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेली समाज बांधवांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तेली समाज मेळाव्यात राज्यातील व बाहेर राज्यातील वधु -वर पालक मोठया संख्येने उपस्थित होऊन वधु -वर परिचय मेळावा कार्यक्रमाचा लाभ घेतले. यावेळी गुणवंत विध्यार्थीनी महाराष्ट्र बुद्धीबळ चॅम्पियन कुमारी भाग्यश्री भांडेकर व तेली समाज सामाजिक जेष्ठ नागरीक विठ्ठल लक्ष्मण बुरांडे यांचा नगराध्यक्ष योगीताताई पिपरे तसेच मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोबरागडे, प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, प्रभाकरजी वासेकर, देवानंद कामडी, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, गजाननजी भांडेकर, तुळदीदास कुनघाडकर, गोपीचंद चांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजक द्वारकाप्रसाद सातपुते यांनी केले तर संचालन प्रा. प्रदीपजी चापले व आभार किशोरजी गव्हारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप उडान, विवेक सातपुते, अतुल भांडेकर, यशवंत भांडेकर, उष्टुजी चलाख, द्रोणाक्ष सातपुते, अजय कुकडकर, किशोर गव्हारे, सुनील जुआरे, सदाशीव भांडेकर, तुळशीदास भुरसे, जिजाबाई सातपुते, मिथुन धोडरे यांनी सहकार्य केले.