ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

323

गडचिरोली : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवार, 8 नोव्हेंबरला सायंकाळी गडचिरोली शहरातील पोलीस स्टेशनसमोर घडली. पोलीस स्टेशनच्या समोर दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटल्याने हा अपघात घडला आणि एकाला आपला जीव गमवावा लागला. दुर्गेश नंदनवार (वय 38) रा. चंद्रपूर असे मृतकाचे नाव असून ते गडचिरोली येथील सुंदरम फायनान्समध्ये काम करीत होते. घटनेच्या दिवशी काही कामानिमित्त एम. एच. 34 बी. वाय. 6615 क्रमांकाच्या वाहनाने इंदिरा गांधी चौकात येत असताना चंद्रपूर मार्गाने गांधी चौकाकडे जाणाऱ्या एम. एच. 12 एम. व्ही. 0349 क्रमांकाच्या टकने धडक दिली. यात दुर्गेश नंदनवार हे जागीच ठार झाले. घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.