धानोरा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंंद्र सुरू करा – दिवाकर भोयर यांची मागणी

119

गडचिरोली : धानोरा तालुक्यात दरवर्षी आधारभूत किंंमतीने खरेदी – विक्री सोसायटी अंतर्गत धान खरेदी केले जाते. माञ यावर्षी पावसाअभावा धान भरलेच नाही आणि हलक्या प्रतिच्या धान्याची कापणी आँँक्टोबर महिन्यात आटोपली. सध्या मध्यम आणि जड धानाची कापनी जोरात सुरु आहे. शेतकरी स्वत:चा प्रपंच करण्याकरिता तसेच सावकारी कर्ज आणि अळीअडचणीकरिता शेतकरी धान्य अतिशय कमी भावात व्यापाऱ्याला विकत आहे. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबविण्याकरिता धानोरा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी दिवाकर भोयर यांनी प्रसिद्धी पञकातुन केली आहे. धानोरा तालुक्यात पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात धान्य पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्ये धान्य पिक रोवणीपुर्वीच पळे वाळले. निसर्गाच्या लहरीपणावर आधारलेली शेती किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या उत्पादनात मोठीच घट उद्वभवत आहे. पाण्याअभावी शेकडो बळीराज्याचे धानपिक करपले. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच धान कापणी करावी लागली. दिवाळी सणाच्या तोंडावर आर्थिक समस्या दूर करण्याकरिता बळीराजाने कापणी व मळनी सुरु केली. त्यामुळे धान्य साठविने शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने धान विकायचे कुठे हाच मोठा प्रश्न बळीराजा पुढे आवासुन उभा आहे. अशाच परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वत:चे धान्य अतिशय कमी किंंमतीत व्यापाऱ्यांना विकायची वेळ आली आहे. गावागावात असलेले खाजगी व्यापारी बळीराजाचे धान्य अतिशय कवडिमोल भावात घेत आहेत. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होतांना दिसते. धान्याची खरेदी करण्याकरिता खरेदी केंद्रावर सातबारे सप्टेंबर महिन्यापासुन आँनलाईनची कामे सुरु असूनही दिवाळी उलटली. पण धान खरेदी केंद्र सुरु झालेली नाही. सध्यातरी बळीराजावर तिहेरी संकट उभे ठाकल्याचे दिसुन येते. पाण्याअभावी धान्य करपले, उभे असलेले धान्य किडीने फस्त केले आणि हाती आलेले धान्य सरकार घेण्याच्या कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही. जगाचा पोशिंंदा समजला जाणारा बळीराजाच भरडल्या जात आहे. त्यामुळे सरकारने सकारात्मक पाऊल उचलून धानोरा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी दिवाकर भोयर यांनी केली आहे.