गडचिरोली येथे आज डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन

169

– रक्तदान शिबिर, सामूदायिक प्रार्थना, भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली : डॉ. शिवनाथजी कुंभारे यांना ७५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन गुरुवार, ११ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता चामोर्शी मार्गावरील कमल – केशव सभागृह कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राळेगण सिद्धी येथील ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार, भाजपाचे माजी संघटन मंत्री रविजी भुसारी, लेखा-मेंढा येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा, भ्र. वि. ज. जा. महाराष्ट्र उपाध्यक्ष बालाजी कोपुलवार, भ्र. वि. ज. जा. महाराष्ट्र सचिव अशोकजी शब्बन, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मारोतराव कोवासे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने धन्वंतरी हॉस्पिटल अँँड मल्टीस्पेशालिटी सेंटर गडचिरोलीच्या वतीने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत धन्वंतरी हॉस्पिटल चामोर्शी रोड गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच
श्री गुरुदेव सेवा मंडळ मुख्य शाखा रामनगर व गोकुळनगर येथे सायंकाळी ६ ते ७ वाजता सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ७.३० ते १० वाजता नाशिक येथील पंडित वैराळकर यांचा भक्ती संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुंभारे परिवाराच्या वतीने सुमन शिवनाथ कुंभारे, डॉ. अनंता शिवनाथ कुंभारे, राणी अनंता कुंभारे, प्रदीप हेडाऊ, संगिता प्रदीप हेडाऊ, जितेंद्र मोरे, वर्षा जितेंद्र मोरे यांनी केले आहे.