गडचिरोली : गडचिरोली येथे एस. टी. महामंडळ कर्मचारी यांच्या वतीने आज, 9 नोव्हेंबरला आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र व संजय सुर्वे, विभाग नियंत्रक गडचिरोली विभाग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वाडीभस्मे, विभागीय वाहतूक अधिकारी गडचिरोली, मंगेश पांडे, गडचिरोली आगार व्यवस्थापक, एल. बी. चौधरी, वाहतूक नियंत्रक,
राजरत्न पेटकर, किशोर देशमुख, नारायन फड, व बहुसंख्येने एस. टी. कर्मचारी, सामान्य रूग्णालयाचे डाॅक्टर, कर्मचारी उपस्थित होते. एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरन करा व ईतर मागण्याकरिता एस. टी. कर्मचारी संपावर आहेत. संपात असताना ही सामाजिक बांधिलकी व कोव्हिड काळात रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन रक्तदान शिबिर अश्या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.