जिमलगट्टा येथे जिओच्या नेटची व्यवस्था करा – जावेद अली

92

गडचिरोली : जिमलगट्टा हे अहेरी पासून 50 किमी अंतर असून या ठिकाणी जिओ टाँवर उभारून नेटची सुविधा उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी भाजपा अल्पसंख्यांंक मोर्चाचे जिल्हा महामंत्री जावेद अली यांनी केली आहे. जिमलगट्टा व परिसरात 20 ते 25 गावे येत असून या गावात जिओ नेटवर्क नसल्याने जनतेला खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिमलगट्टा येथे bsnl ची सेवा असूनही नसल्यासारखी आहे. जर या परिसरातील जनतेला मोबाईलद्वारे इतर ठिकाणी बातमी कळवायची झाल्यास खूप वेळा अडचणी निर्माण होते. कारण bsnl ची नेटवर्क कधीही डिस्कनेक्ट होईल याचा नेम नाही. 24 तास जिओ नेटवर्क उपलब्ध असतो त्याकरिता जिमलगट्टा व परिसरातील 20 ते 25 गावाची मागणी होत आहे. करििता या ठिकाणी जिओ टाँवर उभारून देण्याची मागणी भाजपा अल्पसंख्यांंक मोर्चाच्या वतीने जावेद अली यांनी केेली आहे.