चामोर्शी येथे शहीद स्मारकाकरिता भूखंड उपलब्ध करून देणार – आमदार डॉ. देवराव होळी

123

– चामोर्शी शहरातील युवकांचा शहीद स्मारकाकरिता पुढाकार

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे चामोर्शी शहरातील विविध प्रभागातील नवयुवक यांनी एकत्रित येऊन आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन दिले व चामोर्शी शहरवासी येथील पोलिस विभागातील वीर शहीद रोशन डंबारे, भक्तदास शेट्टीवार यांंचे स्मारक व्हावे यासाठी शहीद स्मारकाकरिता भूखंड मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी समस्त नवयुवकांच्या मागणीची दखल घेत तत्काळ भूखंड मिळवून देण्याचे आश्वासन दिले व समस्त युवकांचे प्रेरणास्थान येथील शहीद स्मारक व्हावे यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असे सांगितले. यावेळी प्रामुख्याने चेतन अल्सावार, स्नेहल तुरे, कुणाल सोमनाथे, राहुल गोलाईत, गोल्डी बोरकर, पोषक गेडाम, अजिंक्य तुरे, शुभम बनपूरकर, शुभम पोटवार, महेश पिपरे, शुभम कुनघाडकर, गोटू तुरे, राकेश भैसारे व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.