दीक्षाभूमीच्या विकासाकरिता पाठपुरावा करण्याची जेसाभाऊ मोटवानींकडे समाजबांधवांनी केली मागणी

120

गडचिरोली : देसाईगंज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीचा विकास घडवुन आणण्यासाठी जेसाभाऊ मोटवानी यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. महाराष्ट्र काँँग्रेस कमिटी ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी जेसाभाऊ मोटवानी यांची नुकतीच निवड झाली. त्याबद्दल समाजातील विविध संघटनांच्या माध्यमाातून त्यांचा सत्कार करण्यात आला. देसाईगंज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीचा विकास सद्या खंडीत झाला असून या परिसरात सुशिक्षीत युवक – युवतींना अभ्यासाकरिता सोयीचे होईल अशी सुसज्ज अभ्यासिका निर्माण करण्याकरिता आपण महाराष्ट्र राज्याातील सत्तेत असलेल्या आघाडी शासनातील घटक पक्षाचा एक भाग म्हनुण शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती जेसाभाऊ मोटवानी यांना समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी इंजि. विजय मेश्राम, मारोती जांभुळकर, राजरतन मेश्राम, अँँड. मंगेश शेंडे, प्रकाश सांगोळे, छगण सेडमाके आदी समाजबांधव उपस्थित होते.