आदिवासी जिल्हा गोटुल समितीच्या चांदाळा मार्गावरील गोटुलच्या वनजमिनीचा प्रश्न त्वरित निकाली काढा – खा. अशोक नेते

164

– खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात गोटुल समितीची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

गडचिरोली : आदिवासी गोटुल समितीची अतिक्रमित वनजमीन समितीला हस्तांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी व वनहक्क समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. जिल्हा आदिवासी गोटुल समितीने 1991 पासून अतिक्रमण करून त्या गोटुल भूमीवर गोटुल समिती आदिवासींचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या 30-31वर्षी पासून करीत आहेत. ती जमीन आदिवासी गोटुल समितीला द्यावी, अशी मागणी खासदार अशोक नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी वनविभागाचे अधिकारी यांना जमीन देण्याबाबत सूचना दिल्याने गेली 30-31 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गडचिरोली चांदाळा मार्गावरील आदिवासी गोटुल भूमिचा प्रश्न निकालात निघनार आहे. खा. अशोक नेते यांच्या नेत्रुत्वातील शिष्टमंडळात प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र तथा दिशा समिती जिल्हा सदस्य, गडचिरोली, नंदुभाऊ नरोटे, अध्यक्ष जिल्हा आदिवासी गोटुल समिती गडचिरोली, समाजसेवक देवाजी तोफा, उपाध्यक्ष गोटुल समीती, अनिल कुनघाडकर उपाध्यक्ष न.प.गडचिरोली, भरत येरमे, अध्यक्ष आदिवासी कर्मचारी संघटना गडचिरोली, अँड. मोहन पुराम, सरचिटणीस गोटुल समिती गडचिरोली, इंजी. मोहन गावड, कार्याध्यक्ष, आदिवासी कर्मचारी संघटना, इंदिरानगर येथील वनहक्क समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुकुडकर, समितीचे पदाधिकारी, वनविभाग, महसूल विभाग, न. प.मुख्याधिकारी उपस्थित होते.