उद्या पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर

81

– जिल्हा नियोजन कार्यकारी समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित

गडचिरोली : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे शनिवार, 30 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हयात दौऱ्यावर येत आहेत. ते विस्थापित हत्तींसाठी संरक्षक जागांबाबत पाहणी करणार आहेत. तसेच पोलीस विभागाच्या जवानांसोबत दिपावलीपूर्व शुभेच्छा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची बैठक गडचिरोली येथे होणार आहे.