२००५ नंतर कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा – पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आ. डॉ. देवराव होळी यांना निवेदन

135

कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा

गडचिराेली : सन २००५ नंतर कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना सुरू केली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला असून नविन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने डी.सी.पी.एस./ एन.पी.एस. ही नवीन योजना सुरू केली आहे. परंतु ती सुद्धा अन्यायकारक असून त्या योजनेचा मयत कर्मचाऱ्यांना कवडीचाही फायदा नाही. त्यामुळे एन.पी.एस. योजना बंद करून भविष्य निर्वाह निधी या खात्यात वर्ग करावे, जेणेकरून वैद्यकीय सुविधा, विवाह, उच्च शिक्षण याकरिता अग्रिम धन काढणे सुलभ होईल. करिता नविन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे केली आहे.