कोरोनाचे नियम पाळून क्रीडा स्पर्धांचा आनंद घ्यावा : आमदार डॉ. देवरावजी होळी

83

– मुरमुरी येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सध्या संपूर्ण जगात कोरोणा विषाणूने थैमान घातले असून या कठीण प्रसंगी होत असलेल्या कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडा स्पर्धकांनी व गावकऱ्यांनी मास्क लावून कोरोणा नियमांचे पालन करून स्पर्धांचे नियोजन करावे व या स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुरमुरी येथील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी मंचावर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, पोलीस पाटील दिवाकरजी पुण्यप्रेडिवार, पंचायत समिती सदस्य रेखाताई नरोटे, ग्रामसेवक रामटेकेजी, तळोधीचे माजी सरपंच किशोरजी गटकोजवार यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
संमिश्र युवा कबड्डी मंडळ मुरमुरी च्या वतीने मुलांचे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेला परिसरातील क्रीडापटूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सर्वांनी काळजी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करीत सर्वांनी मास्क लावून, नियमांचे पालन करून खेळांमध्ये सहभागी व्हावे व खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.