नशाबंदी मंडळाच्या वतीने उद्या गडचिरोलीत जनजागृतीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

119

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र गडचिरोलीच्या वतीने उद्या, 31 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकात जनजागृतीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजामध्ये वाढणारी व्यसनाधीनता खूप भयानकरूप धारण करीत असल्याने, युवक वर्ग त्यात पूर्णत: या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये शक्तिशाली, व्यसनमुक्त राष्ट्र घडवण्याचे दृष्टीने आपले सर्वांचे कर्तव्य समजून नववर्षाच्या सुरुवातीला नव संकल्प करून घेण्याच्या दृष्टीने सदर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. मित्रांसह आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि इतरांनाही सहभागी करावे. व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या युवा वर्गांना रोखण्यासाठी हा 31 डिसेंबरचा महत्त्वाचा दिवस आहे. यादृष्टीने आपण सारे उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नशाबंदी मंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष उदय धकाते, जिल्हा संघटक संदीप कटकुरवार यांनी केले आहे.