शिवसेनेच्या वतीने उद्या अमिर्झा जि. प. क्षेत्रात मोफत आरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिर

198

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वंदनिय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शुक्रवार ३१ डिसेंबर २०२१ रोजी अमिर्झा जि. प. क्षेत्रात मोफत आरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिर उद्या सकाळी १० वाजता कळमटोला, दुपारी २ वाजता चांभार्डा तसेच सकाळी १० वाजता बेलगाव व दुपारी २ वाजता मरेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी आरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, तथा समस्त शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना सहसंपर्क तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले आहे.