संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

86

विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : संताजी सोशल मंडळ गडचिरोलीतर्फे इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे 8 डिसेंबर रोजी श्री संताजी जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर तर प्रमुख अतिथी म्हणून संताजी सोशल मंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, सचिव गोपीनाथ चांदेवार, सुरेश भांडेकर, राजेश इटनकर, सुधाकर लाकडे, अनिल बालपांडे, रामराज करकाडे, विठ्ठलराव कोठारे, विष्णुजी कामडे, महादेव वाघे, सुधाकर दुधबावरे, मारोती दुधबावरे, किरमे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवानंद कामडी यांनी केले. संचालन विलास निंबोरकर यांनी तर आभार प्रदर्शन रामराज करकाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी सोशल मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.