आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

108

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी गडचिरोली शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये सकाळी 8 वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे मनोरुग्णांना ब्लँकेट वाटप, सकाळी 10 वाजता महिला रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप कार्यक्रम, 10.30 वाजता नगर परिषद परिसरात वृक्षारोपण, 11 वाजता पंचायत समिती गडचिरोली येथे घरकुलांच्या चावी वितरण व केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता रांगी येेेथे वृक्षारोपण व वाढदिवस कार्यक्रम, दुपारी 3 वाजता रायपूर येथे सत्कार कार्यक्रम व सभागृह लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.