युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता क्रीडा क्षेत्रात करिअर करावे : महेंद्र ब्राम्हणवाडे

88

– हिरापूर येथे कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : युवा क्रीडा कबड्डी मंडळ हिरापूर यांच्या सौजन्याने हिरापूर येथे नुकताच भव्य डे- नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आरमोरीचा चमू प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून दुसऱ्या क्रमांकावर हिरापूर व तिसऱ्या स्थानी शिरपूरची चमू होती. या सर्व चमूंचा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते अनुक्रमे 20000, 17000, 10000 रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन विजयी संघाचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 25 चमुंंनी सहभाग घेतला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सोशिअल मीडियाचे महासचिव नंदुभाऊ वाईलकर, जिल्हा काँग्रेसचे सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर मिसार, काँग्रेसचे नेते जितेंद्र मुनघाटे, वसंत राऊत, धिवरू मेश्राम, दामोदर मंडलवार, सरपंच शालिनीताई कुंभारे, पो. पा. के. व्ही. जेंगठे, अण्णाजी मडावी, गुड्डू ठाकरे, रमेश मेश्राम, प्रतिभा साखरे मुख्याध्यापिका, गौरव एनप्रेड्डीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने आदी गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले, खेळ हा खेळाप्रमाणेच खेळून त्या वेळचा प्रतिस्पर्ध्या संदर्भातील द्वेष हा मैदानातच ठेऊन आता ज्यांचा विजय झाला त्यांनी अति उत्साहात न जाता व जे अपयशी झाले ते खचून न जाता पुन्हा नव्याने एकत्र येऊन युवकांनी कामाला लागून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याकरिता प्रयत्न करा. या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन विलास मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष समीर मिसार, उपाध्यक्ष हरिष जेंगठे, सचिव महेश निखुरे, कोषाध्यक्ष भुवनदास मेश्राम, क्रीडाप्रमुख सौरव मडावी व सम्पूर्ण मंडळाचे सदस्य व गावकऱ्यांनी मिळून केले.