पोटेगाव आश्रमशाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा

89

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत क्रांतिसूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षक एस. डी. गोट्टमवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षिका प्रमिला दहागावकर, के. पी. मेश्राम, पदवीधर प्राथमिक शिक्षिका प्रतिभा गोवर्धन, प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसू, व्ही. एम. नैताम, अधीक्षक एस. आर. जाधव, अधीक्षिका एल. आर. शंभरकर, रजत बारर्ई आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या भाषणासह विद्यार्थीनी वनश्री कुमरे, वच्छला कुमरे, शिवाणी पोटावी, रनिता कुमरे, सुष्मिता वड्डे आदींची भाषणे झालीत. डॉ. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल केल्यास जीवन यशस्वी होते. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करावा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा महामंत्र जगाला डॉ. बाबासाहेबांनी दिला. विद्यार्थ्यांंनी हा महामंत्र गिरवावा व सामाजिक द्रूष्टिकोन निर्माण करून देशहिताचे कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कर्मचारी व विद्यार्थ्यानी सहकार्य केले.