पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे केले सांत्वन

110

चंद्रपूर : दोन – तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या करणारे निफन्द्रा येथील शेतकरी वामन मारबते (वय 55) यांच्या घरी जावून राज्याचेे मदत व पुुनर्वसन मंंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी कुटुंबाचे सांत्वन करून आर्थिक मदत केली. मारबते यांच्या पत्नी शोभा आणि मुलगा राहुल यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ व नियमानुसार आर्थिक मदत देण्याबाबत तहसीलदार यांना सूचना केल्या.