साडेनऊ लाखांची दारू जप्त ; चार जणांना अटक

105

– गडचिरोली पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 28 जुलै : 

गडचिरोली पोलीस पथकाने आज, २९ जुलै रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून 9 लाख 48 हजार 800 रुपये किंमतीची दारू व मुद्देमाल जप्त केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने दारू विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोपनिय माहितीच्या अनुषंगाने आज, 29 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथके तयार केले. एक पोलीस पथक मुरखळा गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाळत ठेवले असता, दुचाकीवरुन 28 हजार 800 रुपये किंमतीच्या 2 बॉक्स विदेशी दारुची वाहतूक करताना मिळून आल्याने अमित यशवंत रोहणकर (वय 25 वर्षे, रा. मोखाडा, ता. सावली, जि. चंद्रपूर) यास मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला. दुसरे पोलीस पथक कोटगल चौकात सापळा रचून बसले असताना, एक संशयीत दुचाकी वाहन येत असल्याचे दिसल्याने वाहनाची तपासणी केली. वाहन चालक व मागे असलेल्या ईसमाच्या मध्ये 40 नग विदेशी दारुच्या बाटला मिळून आल्याने येलंधर मलय्या गनबोईनवार (वय 47 वर्षे, रा. कनेरी, ता. जि. गडचिरोली व विनोद मधुकर मेश्राम (वय 28 वर्षे, रा. पारडी, ता. जि. गडचिरोली) यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

गडचिरोली कॉम्प्लेक्स परीसरात नाकाबंदी दरम्यान एका संशयीत वाहनास थांबण्याचा ईशारा करताच वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी करुन दरवाजा उघडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास ताब्यात घेवुन त्याचे व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 2 लाख 48 हजार रुपये किंमतीच्या देशी दारुचे एकुण 31 बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी मिळुन आल्याने आकाश पुरुषोत्तम कापकर (वय 30 वर्षे, रा. सर्वोदय वार्ड क्रमांक 4, गडचिरोली, ता. जि. गडचिरोली) , व्यवसाय वाहन चालक याच्याविरुध्द पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

एकाच रात्रो अशा एकुण वेगवेगळ्या तीन घटनामध्ये 2 लाख 88 हजार 800 रुपये किंमतीचा दारु मुद्देमाल व 6 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दारु वाहतुकीकरीता वापरलेले वाहन असा एकुण 9 लाख 48 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल. व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक श्री. दिपक कुंभारे, सपोनि श्री. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात नापोशि/दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, सतीश कत्तीवार, पोअं/ श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, मंगेश राऊत, चापोना/मनोहर तोगरवार, माणिक निसार यांनी केलेली आहे.