Home गडचिरोली शिक्षणातून स्वतःची ओळख निर्माण करा : इंजि. प्रमोदजी पिपरे

शिक्षणातून स्वतःची ओळख निर्माण करा : इंजि. प्रमोदजी पिपरे

93

– संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विकास ही संज्ञा अतिशय गतिशील आणि किचकट आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये विकास होण्याकरिता शिक्षण हाच मुळ पाया आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणातून स्वतःची ओळख निर्माण करून सामाजात एक विशेष स्थान निर्माण करावे. तसेच ओबीसी समाजाला शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.

स्थानिक संताजी भवन दालनामध्ये संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

तेली समाजातील १० वी मध्ये ८० टक्के तथा १२ वीमध्ये ७० टक्केच्या वर गुण प्राप्त करण्याऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्धाटन मनपा आयुक्त नागपूर अनिलजी गुलहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून संस्थापक श्री. संताजी अखिल तेली समाज संघटन (म.रा.) अनिलजी बजाईत, संताजी सोशल मंडळचे अध्यक्ष श्री. देवानंद कामडी, प्रमुख अतिथी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था अध्यक्ष श्री. भाग्यवानजी खोब्रागडे, प्रमुख अतिथी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे,यांनी सुध्दा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला तेली समाज नागपूर शहर अध्यक्ष श्री.संजयजी मेहर, माजी जिल्हा सत्र न्यायाधीश प्रमोदजी तरारे, संताजी सोशल मंडळ सचिव गोपीनाथ चांदेवार, उपाध्यक्ष रामदासजी कुंघडकर, सहसचिव अनिल बालपांडे, सुरेश भांडेकर, सुधाकर लाकडे, निवृत्तीजी शेंडे, महादेवराव वाघे, विठ्ठलराव कोठारे, चंद्रकांत किरमे, चंद्रकिशोर किरमे, बालाजी भूरले, तसेच संताजी सोशल मंडळ गडचिरोलीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक व समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!