Home गडचिरोली मा. खा. अशोकजी नेते व मा आ. प्रा. अतुलजी देशकर यांची भाजपा...

मा. खा. अशोकजी नेते व मा आ. प्रा. अतुलजी देशकर यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी सांत्वना भेट

192

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री स्व. सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे १ जुलै २०२४ ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

या सबंधित माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते व माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर यांनी कोराडी नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देऊन आईच्या प्रतिमेला पुष्प वाहत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आत्म्यास शांती देवो व बावनकुळे परिवाराला दुःख सावरण्याचे बळ देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

याप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचीही यावेळी भेट झाली.

error: Content is protected !!