Home गडचिरोली चिरचाडी गावात चक्रीवादळामुळे राहत्या घराची नुकसान

चिरचाडी गावात चक्रीवादळामुळे राहत्या घराची नुकसान

101

– आमदार कृष्णा गजबे यांनी केली नुकसानग्रस्त घराची पाहणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी, लक्ष्मीपूर येथे २१ मे २०२४ रोजी आलेल्या मुसळधार पाऊस व चक्रीवादळामुळे चिरचाडी गावातील काही घरांवर झाडे पडून मोठया प्रमाणात घराची हानी झाली. २१ मे च्या रात्रीच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळाने चिरचाडी, लक्ष्मीपूर व लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याबरोबर चक्रीवादळाने घरांची छपरे उडाली व झाडेही मोडून पडली. चिरचाडी व लक्ष्मीपूर येथील लखंदाश श्यामराव करपते, मोरेश्वर श्रीराम उईके, शशिकला सुखदेव कावसे यांच्या घरावरचे छप्पर चक्रीवादळाने उडविलयाने नुकसान झाले. काही घरांवर झाडे पडून गेल्याने राहत्या घराचे आणि घरगुती सामानाचेही नुकसान झाले. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा गजबे यांनी चिरचाडी व लक्ष्मीपूर या गावी जाऊन नुकसानग्रस्त कुटूंबियाची भेट घेऊन घराची पाहणी केली व संबधित विभागला पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाईचे आदेश दिले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, रविंद्रजी गोटेफोडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक खेमनाथ पाटील डोंगरवार, ग्रामसेवक गेडाम व गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

error: Content is protected !!