– आ. गजबे यांच्या पाठपुराव्याला यश ; नागरिकांना दिलासा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिराेली : कुरखेडा – कोरची मार्गावर शहरालगत असलेल्या सती नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम तांत्रिक अडचणीमुळे मागील २ महिण्यापासून बंद होते. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होत मोठी समस्या निर्माण होणार होती. मात्र या क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यानी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करीत व त्यांची व्हीडिओ कांन्फरेंसद्वारे संयुक्त बैठक घेत चर्चा केली व निर्माण झालेली तांत्रिक अडचण मार्गी लावली. यानंतर मागील २ महिण्यापासून बंद असलेले सदर पुलाचे बांधकाम पून्हा सुरू झाल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर ते रायपूर मंजूर नविन राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सद्या ब्रम्हपूरी ते वडसा, कुरखेडा, कोरची या मार्गाचे रूंदीकरण, मजबूतीकरण तसेच या मार्गातील पूलाचे महामार्गाला अनुसरत आवश्यक ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत कूरखेडा सती नदीवरील जूना मात्र व्यवस्थीत असलेल्या पूलाला तोडत याच ठिकाणी उंच व मजबूत नविन पूलाचा बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती. मात्र सदर बांधकाम हे वनविभागाचा जमीनीवर असल्याने ४.९८ हेक्टर आर. जागा वनविभागाकडून वळती करून घेण्याकरिता प्रस्ताव सादर करीत पर्यायी वनीकरणाकरिता ३१ मार्च २०२४ रोजी २७ लक्ष ९९ हजार २७ रूपयांचा भरणा राष्ट्रीय महामार्ग यांचा वतीने वडसा वनविभागाकडे करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र या खात्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे रक्कम जमा करता आली नाही. या तांत्रिक अडचणीमुळे सदर बांधकाम बंद होते.
सती नदीवरील हा पूल अत्यंत महत्वाचा आहे कुरखेडा ते कोरची, मालेवाडा, वैरागड यांना जोडणारा आहे. तसेच नदी पलीकडील अनेक लहान मोठी खेडी गावे या पूलाने तालुका मूख्यालयाशी जोडलेली आहेत. सद्या बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने कच्चा रपटा तयार करीत येथून वाहतूक सूरू आहे. मात्र हा कच्चा रपटा पावसाळ्यात वाहून जाण्याची पूर्ण शक्यता असल्याने नविन पूलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यास हा मार्ग बंद होत नागरिकांची मोठी अड़चन होत त्यांच्यात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात या मार्गाला पर्यायी असलेले मार्ग फेर्याचे तसेच लहान पूल, गाव खेड्यातून गेलेले अरूंद व नागमोडी रस्ते यामूळे हा मार्ग धोक्याचा व जडवाहतुकीकरिता अशक्य आहे. त्यामुळे या नविन पूलाचे बांधकाम यूद्धपातळीवर करीत पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याकरिता आ. गजबे यांनी पूढाकार घेत मूख्य वनसंरक्षक गडचिरोली, उपवनसंरक्षक वडसा तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता गडचिरोली यांच्याशी संयुक्त व्हीडिओ कांन्फरेंसद्वारे चर्चा करीत हा प्रश्न मार्गी लावला.
तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मंगळवार रोजी आमदार कृष्णा गजबे व भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी प्रत्येक्ष भेट देत बांधकामाची पाहणी केली व तिथे उपस्थित प्रोजेक्ट अभियंता नागा बाबू यांच्याशी चर्चा करीत यूद्ध पातळीधर सदर बांधकाम पूर्ण करण्याचे तसेच पर्यायी बांधकाम करण्यात आलेल्या रपट्याचे मजबूतीकरण व उंचीकरण करण्याची सूचना केली आहे.





