महायुतीचे उमेदवार खा. अशोकजी नेते व चिमुरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात सभा संपन्न

51

– भाजप महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या विजयासाठी प्रयत्न करा : आ. बंटीभाऊ भांगडिया, डॉ. नामदेव उसेडी, वसंत वारजूकर यांचे आवाहन

– मासळ येथे जि. प. क्षेत्र पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन सभा संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

चिमूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहित कल्याणकारी योजना अमलात आणल्या असून मी खासदार असताना पाच वर्षात विविध विकासाची कामे केली आहे. भारत विश्वगुरू करण्यासाठी व अब की बार ४०० सौ पार साठी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पक्षाने मला भाजप महायुतीची उमेदवारी दिली असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोमाने पुन्हा कमळ फुलविण्याची विनंती महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोकजी नेते यांनी यांनी केले.

भारत उज्वल देश घडविण्यासाठी व सलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार अशोकजी नेते यांना परत खासदार करण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केले. मासळ येथील माजी जि. प. सदस्य डॉ. देवनाथ गंधारे यांच्या आवारात मासळ जि. प. भाजप विभागाच्या बैठक झाली. यावेळी भाजप जेष्ठ नेते वसंत वारजुकर, ओबीसी प्रदेश नेते राजूभाऊ देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनिष तुंमपल्लीवार, पं. स. माजी सभापती प्रकाश वाकडे, माजी जि. प. सदस्य डॉ. देवनाथ गंधारे, सहकार नेते ओमप्रकाश गनोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम डुकरे, माजी संचालक कलीम शेख प्रवीण गणोरकर, वामन बांगडे, अब्दुल शेख पटेल, असिफ शेख, अशोक कामडी, महिला तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, माजी पं. स. सदस्य वर्षा लोणारकर, भूषण डाहूले, सचिन डाहूले यांच्यासह मासळ जिप क्षेत्रातील बुथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन व आभार सरपंच गजानन गुळधे यांनी केले.