Home गडचिरोली सर्विस रोडकरिता अतिक्रमण हटवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सर्विस रोडकरिता अतिक्रमण हटवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

210

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्विस रोडचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद हद्दीतील बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

गडचिरोली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या सर्विस रोडच्या जागेवर राष्ट्रीय महामार्गालगत प्रस्थापितांनी व व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पक्के बांधकाम केलेले आहेत. यामुळे शहरात महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतरही नागरिकांकरिता सर्विस रोडचे बांधकाम होवू शकलेले. तसेच मोठे व्यापारी व प्रस्थापितांच्या दबावामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने म्हटले आहे.

शहरातील महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येवून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषद हद्दीतील सर्विस रोड व इतर आरक्षित जागांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविणे गरजेचे असतानाही त्याठिकाणी बेकायदेशीरपणे जाहिरात फलक, होर्डींग्ज आणि अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून आरक्षित आणि सर्वीस रोडवरील जागांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डींग्ज व इतर सर्व प्रकारचे अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

error: Content is protected !!