Home गडचिरोली लॉयडस मेटल कंपनी सुरजागड येथे पांडू तेलामी यांच्या हस्ते हस्ते ध्वजारोहण

लॉयडस मेटल कंपनी सुरजागड येथे पांडू तेलामी यांच्या हस्ते हस्ते ध्वजारोहण

206

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आर्यन ओर माईन्स कॉम येथील मैदानावर पार पडला. हेडरी येथील 90 वर्षीय वयोरुद्ध श्री. पांडू कोत्तूं तेलामी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी त्यांना संचालक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

लॉयडस मेटल कंपनीकडून अधिकारी, कर्मचारी यांचे विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेता संघाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी लॉयडस मेटल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌. त्या अनषंगाने सुरजागड येथे प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!