Home गडचिरोली शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही

शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर लूट कदापि खपवून घेणार नाही

100

– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर सर्रास लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत असून शेतकऱ्यांची ही  लूट कदापि सहन करणार नाही,  असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

अविका संस्था व फेडरेशन हमीभावाणे धान खरेदी करतात. आदिवासी विकास महामंडळाने ठरवून दिलेल्या अटीशर्तीनुसार हमीभाव धान खरेदी कारावे लागते. शासनाच्या नियमाप्रमाणे 40.600 घ्यायचे धोरण आहे. परंतु सर्रास शेतकऱ्यांकडून 41.600 किव्हा 42 केजी घेतले जाते. जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग अशिक्षित असल्याने धान खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल करून पिळवणूक केली जाते व क्विंटलच्या मागे अडीच ते तीन किलोची लूट केली जाते. यामुळे शासन धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. उलट शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसत असल्याचे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.

ही पिळवणूक थांबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, एखाद्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असेल त्याबाबतचा जाब व्यवस्थापक किंवा सचिवांना विचारावा. त्याचक्षणी तुमच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला संबंधित सचिवावर स्वतः तक्रार नोंदवावी. तसेच  धान खरेदी केंद्रावर काटा करताना खरेदी वजनाचे फोटो की व्हिडीओ काढावे व 9405645963 या नंबरवर पाठवावे, असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केले आहे.

error: Content is protected !!