Home गडचिरोली अखंड महानाम यज्ञ तथा भगवत कथेला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी...

अखंड महानाम यज्ञ तथा भगवत कथेला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट घेऊन घेतले दर्शन

101

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्रीनिवासपूर येथील वैष्णव – वैष्णवी सम्मेलन तथा अखंड महानाम यज्ञ तथा भगवत कथेला महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी भेट घेऊन दर्शन घेतले.

चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपूर येथे मकर संक्रांती उत्सव निमित्त सार्वजनिक श्री श्री राधा गोविंद मंदिर, ७७ नं. श्रीनिवासपूरच्या वतीने वैष्णव – वैष्णवी सम्मेलन तथा अखंड महानाम यज्ञ तथा भगवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
वृंदावनचे कथावाचक श्री श्रीधर महाराज यांच्या वतीने भगवत कथेचे वाचन करण्यात आले. श्रीनिवासपूर या भागात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या भगवत कथा प्रसंगी उपस्थित राहून स्थापित श्री श्री राधा गोविंदाचे चरणी नतमस्तक होऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी पर्यावरण काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर, समितीचे अध्यक्ष विवेक गयाली, उपाध्यक्ष शंकरी मुजुमदार, सचिव राजेश मुजुमदार, अनिता घरामी, असीम अधिकारी, अजित हालदार, गौतम पाल, शिवू मिस्त्री, परेश सरकार, नरेन हालदार, तुलू मिस्त्री, रतन सरकार, पंकज खोबे, दत्तात्रेय करंगामी आदी श्रीनिवासपूर भागातील ग्रामवासी उपस्थित होते.

error: Content is protected !!