Home गडचिरोली मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रितपदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड

मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रितपदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड

165

– जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक खासदार व आमदार राहणार कायम निमंत्रित सदस्य

– मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

– मार्कंडा देवस्थानच्या विकासाला मिळणार गती

गडचिरोली : विदर्भाची काशी असलेल्या मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जिल्ह्याचे पालकमंत्री स्थानिक खासदार व आमदार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांचे अभिनंदन केले आहे. मार्कंडा देवस्थानचे मंदिर मागील अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुरुस्तीकरिता खुले करण्यात आले असून अजूनपर्यंत काम पूर्ण नाही. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या थांबलेल्या कामाला गती मिळावी व मार्कंडा देवस्थानच्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष लक्ष राहावे या हेतूने मार्कंडा देवस्थान ट्रस्टने जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार व खासदार यांची कायम निमंत्रित सदस्यपदी निवड केली आहे.

error: Content is protected !!