पोटेगावात निबंध, सुविचार व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

175

– पोलीस मदत केंद्राचा पुढाकार : विजेत्यांचा पारितोषिक वितरणाने गौरव

गडचिरोली : पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, समीर शेख, अनुज तारे यांच्या संकल्पनेतुन व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निबंध, सुविचार व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांना पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत मंगळवारला पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राम्हणकर होते. प्रमुख अतिथी म्हणुन पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय विनय गोडसे, पीएसआय सचिन उरकुडे, माध्यमिक शिक्षक डॉ. एस. डी. गोट्टमवार, प्रमिला दहागावकर, एएसआय शामराव नेवारे, हवालदार दिनकर धकाते आदी उपस्थित होते.

‘मी गडचिरोली पोलीस दलात असतो तर’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आश्रमशाळेतील ३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात आश्रमशाळेतील इयत्ता १० वीचा विद्यार्थी आर्यन गेडाम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय क्रमांक इयत्ता ९ वीची विद्यार्थीनी शिवाणी पोटावी तर इयत्ता ९ वीचीच विद्यार्थीनी वनश्री कुमरे हिने तृतीय क्रमांक पटकाविले. पोलीस दादालोरा खिडकीवर आधारीत सुविचार स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आश्रमशाळेतील ३० विद्यार्थ्यांंनी सहभाग घेतला. यात आश्रमशाळेतील इयत्ता १० वीची विद्यार्थीनी भारती गावडे हिने प्रथम क्रमांक पटकाविले. व्दितीय क्रमांक इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी अंजली होळी हिने तर तृतीय क्रमांक इयत्ता १० वीची विद्यार्थीनी अनिता नरोटे हिने पटकाविले. विदर्भ विद्यालय पोटेगाव येथे गडचिरोली पोलीस दलावर आधारीत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विदर्भ विद्यालयातील इयत्ता ९ वीची श्रुती कन्नाके हिने प्रथम क्रमांक पटकाविले, व्दितीय क्रमांक इयत्ता ९ वीची राणी सुरपाम तर तृतीय क्रमांक इयत्ता ९ वीचीच विद्यार्थीनी मुस्कान कुरेशी हिने पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना शालेय साहित्य देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धेकांना आता जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर अंतिम विजेत्याची निवड करुन पारितोषिक देण्यात येईल.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना पीएसआय विनय गोडसे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्यातील दडलेल्या सुप्त गुणांना चालना द्यावी. गुणवत्ता वाढवावी व विधायक कार्याकडे वळावे असे आवाहन करुन शाळेच्या उत्स्फुर्त सहभागाबद्दल शालेय प्रशासन, कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षक के. पी. मेश्राम, पदवीधर प्राथमिक शिक्षिका प्रतिभा गोवर्धन, प्राथमिक शिक्षक व्ही. एस. देसु, अधीक्षक एस. आर. जाधव, अधिक्षिका एल. आर. शंभरकर, व्ही. के. नैताम, प्रशांत बोधे, पोलीस कर्मचारी सचिन तलवारे, पंकज भोयर यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.