Home गडचिरोली राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात अभाविप युवा सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात अभाविप युवा सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

98

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहेरी जिल्हातर्फे अहेरी नगरातील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त अभाविप युवा सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम करण्यात आले. या कार्याक्रमामध्ये वकृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेऊन त्यांना प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरव करण्यात आले.

यावेळी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तर मनोरंजन मंडळ, कार्याक्रमचे प्रमुख वक्ते प्रा. रमेश हलामी, अहेरी जिल्हा संयोजक रोहित अविनाश श्रीरामवार, अहेरी नगर मंत्री अभिषेक मोहुर्ले, अहेरी नगर महाविद्यालय प्रमुख अजय सिलवेरी, रितिका दंडीकवार, राजेश किसरवार, करण मारशेटीवार उपस्थित होते.

युवक दिनाचे अवचित साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद युवा सप्ताह म्हणून साजरा करते. अहेरी जिल्ह्यातील विद्यालय व महाविद्यालयात आठवडाभर कार्यक्रमांचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रति प्रेम, वैयक्तिक विकास, वकृत्व या सगळ्या गोष्टींचा विकास या कार्यक्रमाने वाढविण्याचा प्रयत्न अभाविप करत असते. अहेरी जिल्ह्यातल्या अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, आष्टी या सगळ्या तालुक्यात अभाविप विद्यार्थी व कार्यकर्ते कार्यक्रम घेणार आहेत.

प्रास्ताविक भाषण अहेरी नगराध्यक्ष प्रा. गिरीश मद्देर्लावार यांनी केले तर आभार प्रदर्शन आलापल्ली नगर मंत्री रोहित मुक्कावार याने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहेरी सहमंञी आयुष मामिडवार यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापिका कुंडू, प्रा. शिरभाई, प्रा. सरमुकद्दम, प्रा. मोरे, प्रा. राठोड, प्रा. रोहनकर, प्रा. खोब्रागडे, प्रा. धुर्वे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. खंडाळे, प्रा. उरकुडे, प्रा. बारसे आणि विद्यार्थिनी, विद्यार्थी, कार्यकते यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!