विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : कमल -गोविंद स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘दोन घराचं गाव’ या नाटकाचा प्रयोग उद्या, 12 जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुमानंद सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. गोविंदराव मुनघाटे यांनी गडचिरोली जिल्ह्यात ज्ञान सेवेचे दंडकारण्य निर्माण केले आहे. ते आज ह्यात नाहीत. परंतु त्यांची आठवण राहावी म्हणून त्यांच्या जन्मदिनी व्यंकटेश नाट्यमंडळ नवरगाव निर्मित ‘दोन घराचं गाव’ हा नाट्यप्रयोग नामांकित कलावंत संच नवरगावकडून दाखविण्यात येणार आहे.
या नाट्य प्रयोगाचा जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दंडकारण्य शिक्षण व सामाजिक संशोधन संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व कमल -गोविंद स्मृती प्रतिष्ठान दंडकारण्य परिवारातर्फे करण्यात आले आहे.







