– खरमतटोला येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ भक्ती सत्संग गोपाल काल्यानिमित्त भेट
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मनातील कचरा साफ करण्यासाठी भागवतासारख्या ग्रंथाचे नित्यपठण करावे. भागवतातील संस्कृत श्लोकांत विलक्षण शक्ती आहे. भागवत हे भगवंतांचे ब्रह्मरूप असून त्याचे प्रचंड व्यापक वर्णन ग्रंथामध्ये केले आहे. त्यामुळे मन सुद्ध होतो, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ते कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला येथील बालगोपाल गवळी समाज यांच्या वतीने श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ भक्ती सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते देशमुख, सरपंच विजय तुलावी, भाजप बूथ प्रमूख कवळूभाऊ मेश्राम, हभप दखणे महाराज घाटी, हभप पांडुरंगजी महाराज अरतरतोंडी, पोलीस पाटील गीताताई लोहंबरे, ग्राम. पं. सदस्य राकेशजी खुणे, प्रकाशजी बोडखे, घनश्याम दाजगाये व गावातील नागरीक उपस्थित होते.







