Home गडचिरोली लॉयड्स मेटलसतर्फे एटापल्ली येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

लॉयड्स मेटलसतर्फे एटापल्ली येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

119

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात तालुक्यातील 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम दुहेरी सामन्यात राहुल घोष व मनीष ढाली संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद अमित सोनी व प्रशांत कुलयेटी यांना मिळाले. तसेच पुरुष (सिंगल) सामन्यात राहुल घोष याने विजेतेपद पटकावले व प्रशांत कुळयेटी यांना उपविजेतेपद पटकावले.

सदर स्पर्धेचे आयोजन मनीष ढाली व लॉयड्स मेटलस लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिटी फॉउंडेशन यांनी केले.

लॉईड स्टील मेटल्स यांच्या वतीने पुरुष (सिंगल) व पुरुष (डब्ब्ल) प्रथम बक्षीस म्हणून १० हजार, ८ हजार, ६ हजार असे अनुक्रमे पारितोषिक देण्यात आले. या सर्धेत प्रमुख अतिथी म्हणून दिलीप, राजा, राज विलन, पि. एस. आय. शुभम म्हेत्रे, मेजर मुंडे, प्रा. राहुल ढबाले, प्रा. भारत सोनकांबळे, पापा पुण्यमुर्तीवार, प्रसाद नामेवार, बंटी आसुटकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. राहुल ढबाले यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष ढाली, राहुल घोष, प्रशांत कुळयेटी, अमित सोनी, अनुप सरकार, बादल सोनी, प्रेम मजुमदार, प्रीतम दत्ता, जोजो बेपारी यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!