Home गडचिरोली पिपरटोला येथे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते नाटकाचे उद्घाटन

पिपरटोला येथे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते नाटकाचे उद्घाटन

138

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पिपरटोला येथे नवयुवक नाट्य कला मंडळ यांचे सौजन्याने ‘‘हादरा’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्‌घाटन शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले.

वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळणी होताच ग्रामीण भागात जनतेच्या मनोरंजणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून पिपरटोला येथे नवयुवक नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने ‘‘हादरा’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

या नाटकाच्या उद्‌घाटनप्रसंगी शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यासह यादवजी लोहबरे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, सूरज उईके, संदीप आलबनकर, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकुर, रामचंद्रजी भैसारे, आकाश घोडमारे, महेश देशमुख, अरविंद घोडमारे, अनिल निलेकार, चरण घोडमारे, रक्षीत चौके, चंदू करंडे, रोहित धारणे, प्रमोद डोंगरवार, गोलु मानगुळदे, राहुल सोरते आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!