Home गडचिरोली नक्षलग्रस्त भागात कार्यरत विशेष कृती दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ४ हजारप्रमाणे थकबाकीसह कमांडो...

नक्षलग्रस्त भागात कार्यरत विशेष कृती दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ४ हजारप्रमाणे थकबाकीसह कमांडो भत्ता द्या : आमदार डॉ. देवराव होळी

169

गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कृत्यास आळा घालण्यासाठी सी-६० व विशेष कृती दल कार्यरत आहेत.मात्र सी-६० जवानांना ज्याप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता देण्यात येतो, त्याप्रमाणे विशेष कृती दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना दिला जात नाही. त्यामुळे त्यांनाही सी -६० जवानाप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता २०१४ पासूनच्या थकबाकीसह देण्यात यावा, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.

विशेष कृती दलाचे मुख्यालय नागपूर येथे असून कार्यरत कर्मचारी यांची नियुक्ती गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी करण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सध्या मिळणार्‍या प्रवास भत्ता हा त्यांचे साप्ताहिक सुट्टी व रजेचे दिवस भरून देण्यात येतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेहमी मासिक रुपये ३ हजार न मिळता कर्तव्यावर जेवढे दिवस असतात तेवढ्याच दिवसाचा प्रवास भत्ता मिळतो.
सी-६० जवानांप्रमाणे विशेष कृती दलातील जवानांनाही अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात नक्षलवादविरोधी जोखमीची कामे करावी लागतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सी-६० दलातील जवानांना ४ हजार रुपये कमांडो भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे या जवानांनाही कमांडो भत्ता २०१४ पासुनच्या थकबाकीसह देण्यात यावा अशी, मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

error: Content is protected !!