अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करा : आमदार डॉ. देवराव होळी

88

– कापलेल्या धानाच्या कळपा पूर्णतः पाण्यात सापडल्याने पिकांचे प्रचंड नुकसान

– कृषिमंत्री दादाजी भुसे यांची मुंबई येथे घेतली भेट

गडचिरोली : मागील ८-१० दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पाऊस पडत असून धानाच्या कापलेल्या कळपा पूर्णतः पाण्यात सापडल्या आहेत. परिणामी धान पीक पूर्णतः नष्ट झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचेकडे मुंबई मंत्रायलायात भेट घेऊन केली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धानाच्या पिकाची कापणी केली कळपा जमा करण्याचे काम सुरू होते. तसेच मोठ्या प्रमाणात धान कापणीचे कामही सुरू होते. माञ अचानकपणे मागील ८-१० दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू झाल्याने कापलेल्या धानाच्या कळपा पूर्णतः पाण्यात सापडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने अशा नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन केली.