Home गडचिरोली भाजपा ब्रम्हपुरीच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

भाजपा ब्रम्हपुरीच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

128

– खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : श्रद्धेय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी शहरतर्फे पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले

यावेळी खासदार अशोक नेते यांनी या जयंतीनिमित्त बोलताना भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रवादाने भरलेले होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशासाठी समर्पित करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षात विविध पदांवर कार्यरत राहिले. अटलजींचे देशावर नेहमीच प्रेम होते. त्यांच्या राजकीय जीवनात देशभक्ती नेहमीच सर्वोच्च राहिली. त्यांनी राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर हा मंत्र दिला आणि सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रासाठी आपले जीवन समर्पित करण्यासाठी नेहमीच प्रेरित केले, असे व्यक्तव्य याप्रसंगी केले.

माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर यांनी सुद्धा श्रध्येय स्व. अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शहराध्यक्ष इंजिनिअर अरविंद नंदूरकर, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, शहराध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, स्वप्निल अलगदेवे शहर महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी, विक्रम कावळे शहर महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी, सुरेश बनपूरकर, मंजिरीताई राजनकर जिल्हा भाजपा महिला उपाध्यक्षा चंद्रपूर, वर्षाताई चौधरी, रेखाताई राऊत, वैशालीताई ठाकरे, शितल रोकडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!