Home गडचिरोली माना समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षेत उतरून यश मिळवावे : आ. कृष्णा गजबे

माना समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षेत उतरून यश मिळवावे : आ. कृष्णा गजबे

179

– डोंगरसांवगी येथे मुक्ताई जयंती, नागदिवाळी उत्साहात साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिम माना जमातीतील युवक – युवती हे आधुनिक युगामध्ये स्पर्धेच्या यश संपादन करावे आणि माना समाजातील युवकांनी व युवतींनी प्राविण्य प्राप्त करून नोकऱ्या संपादित कराव्या त्यासाठी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज आहे व समाजातील युवकांनी उच्चशिक्षित व्हावे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

26 डिसेंबर २०२३ रोजी आयोजित डोंगरसावगी येथील मुक्ताई जयंती व नागदिवाळीच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथीच्या स्थानावरून बोलताना मार्गदर्शन करीत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आरमोरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पवनभाऊ नारनवरे, सरपंच सुलभाताई गेडाम, रेवणजी मेश्राम ग्रामपंचायत उपसरपंच, वामनरावजी सावसाकडे, अध्यक्ष म्हणून बाळकृष्णजी सावसाकडे, रुपेशजी सावसागडे, गिरधरजीं नारनवरे, पत्रकार दौलत धोटे आरमोरी, उपसरपंच रवी नारनवरे, वाकडे गुरुजी आरमोरी, प्रकाश नारनवरे, देवराव पाटील गरमडे, पोलीस पाटील, घनश्यामजी गरमळे, सेवक दाजी गरमडे कृषी पर्यवेक्षक, दिवाकर गरमळे, प्राध्यापक विशाल रंगारी आणि इतरही माना समाजातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

मुक्ताई जयंती व नाग दिवाळीचे औचित्य साधून मुक्ताई आदिवासी माना जमात ग्रामशाखा डोंगरसावगी यांच्या वतीने दिनांक 25 ते 26 डिसेंबर हा दोन दिवशीय मुक्ताई जयंती व नागदिवाळी चा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मठपूजा आदिवासी देवतांची पूजा करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम रात्रौ आठ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला मंच वरोरा यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 26 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचा समारोप ठेवण्यात आला होता. यानिमित्त सायंकाळी मान्यवर मंडळीचे मार्गदर्शन आणि रात्रो माना आदी जमात डोंगरसावगी येथील महिलांचा दंडारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या समारोपीय कार्यक्रमात बोलताना नगरपरिषद आरमोरीचे प्रथम नगराध्यक्ष पवनभाऊ नारनवरे म्हणाले की, आदिम माना समाज हे एकसंघ व्हावे. त्यांना आधुनिक युगात शिक्षणाच्या प्रवाहात संस्कृतीचे जतन करणे यासाठी हा नागदिवाळ्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो या माध्यमातून समाज प्रबोधन सुद्धा घडत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना वामनरावजी सावसाकडे म्हणाले माना जमातीने निवळ शिक्षणाच्या प्रवाहात नाही तर आधुनिक पद्धतीने शेती आणि शेतीवर आधारित उद्योगधंदे करण्यासाठी भविष्यात पुढाकार घेण्याची गरज आहे आणि आधुनिक पद्धतीने जर शेती उद्योग केले तर नक्कीच ते विकास साधू शकतील असे आवाहनही त्यांनी केले.

नागदिवाळीच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आरमोरीचे पत्रकार दौलत धोटे म्हणाले की, डोंगरसावगी या गावात अनेक युवक युवती हे शिक्षण घेत आहेत. परंतु शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घ्यावे आणि सोबतच पोलीस भरती वनरक्षक भरती एसआरपीएफ भरती व इतरही विविध पदासाठी निघणाऱ्या भरती यासाठी गावात एक अभ्यासिका तयार करून दररोज सकाळ संध्याकाळ किमान एक घंटा अभ्यास करावा आणि त्यामधून डोंगरससावगी येथील युवक दरवर्षी चार ते पाच संख्यांनी नोकरीवर लागतील तेव्हाच खऱ्या अर्थाने नागदिवाळी साजरी होणार आणि त्या माध्यमातून समाजाचा विकास नक्कीच होणार, असे प्रतिपादन यावेळी केले.

या कार्यक्रमाचे संचालन राहुल गरमडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप नार नवरे यांनी मानले. नागदिवाळीचा सण साजरा करण्यासाठी माना आदिम समाज डोंगरससावगी येथील सर्व युवक युती व नागरिकांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!