Home गडचिरोली हरांबा येथील आरोग्य, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला उत्तम प्रतिसाद

हरांबा येथील आरोग्य, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला उत्तम प्रतिसाद

166

– ७०० लोकांना चष्मे वाटप तर ६०० लोकांची केली आरोग्य तपासणी

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : तालुक्यातील हरांबा येथे आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान सोमवार, 25 डिसेंबर रोजी हरांबा येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५००-६०० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी तर ९००-१००० लोकांनी नेत्र तपासणी केली आहे आणि ७०० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आहे.

या सेवाभावी शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सभापती राकेश पाटील गड्डमवार यांनी केले. अध्यक्षस्थानी सावली तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर कारडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून हरांबाचे सरपंच देवानंद मानकर, उपसरपंच प्रवीण संतोषवार, ग्राम काँग्रेस कमिटी हरांबाचे अध्यक्ष मोहन कुनघाडकर, ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष दिलीप लटारे, दिवाकर काचीनवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खुशाल लोडे, लोंढोलीचे उपसरपंच प्रमोद खोबे, युवक काँग्रेस सरचिटणीस रुपेश किरमे, हिरापूर सेवा सोसायटी संचालक मुखरू पाटील गोहने, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, लोंढोली ग्रामपंचायत सदस्य डोमाजी चौधरी, लक्ष्मीबाई भोयर, विठ्ठल मंगर, बादल गेडाम, भूषण गुरुनुले, संतोष शेंडे, विपुल बोदलकर, अमोल भोयर, अभिषेक कुनघाडकर, देवा गेडेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंखेने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!