Home गडचिरोली लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणता येते : डॉ. नामदेव किरसान

लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणता येते : डॉ. नामदेव किरसान

98

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हुकूमशाहीत क्रांतिकारकांनी केलेली आंदोलने हिंसक होती. महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम अहिंसेच्या मार्गाने सुद्धा संघर्ष करता येतो हे शिकविले. लोकशाहीमध्ये हिंसेचा अवलंब न करता मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणता येते. येणाऱ्या काळात आपल्याला परिवर्तन घडवून आणायचे असेल तर सदसदविवेकबुद्धीचा वापर करून मतदान करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी केले.

धानोरा तालुक्यातील निमगाव (रांगी) येथे परिवर्तन नाट्यकला मंडळ निमगावच्या वतीने आयोजित “शहीद” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व पटवून देताना ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, दिघेश्वर धाईत, डॉ. नरेश आलाम, निराशाताई वरखडे, संदीप वरखडे, पुरुषोत्तमजी बावणे, प्रशांत केराम, गावडे पाटील, सुरेशजी खोबे, संजय खोबे, माणिक पेंदाम, प्रमोदजी बोभाटे, रोहिदासजी किरंगे, विनायकजी कन्नाके, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!