– वृद्धाश्रम येथे साडी-चोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सायकलरिक्षा चालकांना ब्लॅंकेटचे वाटप
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकसभा समन्वयक, आदिवासी सेवक (म. रा. शासन पुरस्कृत) तसेच माजी नगरसेवक इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरामध्ये १३ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दुपारी १ वाजता वृद्धाश्रमातील आश्रित महिला वृद्धांना साडी-चोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दुपारी २.३० वाजता सायकलरिक्षा चालकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.





