राष्ट्रीय मानवाधिकार संगठनतर्फे 10 डिसेंबरला मान्यवर व्यक्तींचा सत्कार सोहळा

65

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीतर्फे गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तथा राजकीय, सामाजिक व मान्यवर व्यक्तींचा सत्कार सोहळा 10 डिसेंबर 2023 ला दुपारी 12 वाजता पोटेगाव मार्गावरील गोंडवन कला दालन येथे पार पडणार आहे.

राष्ट्रीय मानवाधिका संघटना दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष महेशजी पटेल यांच्या मार्गदर्शनात प्रदेश अध्यक्ष प्रणयजी खुणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पद्मश्री पुरस्कर्ते डॉ. परशुराम खुणे यांचा सत्कार व गडचिरोली जिल्ह्यातील 150 उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व सिल्वर मेडल देऊन सत्कार केल्या जाणार आहे. या कार्यकमाला मा. धर्मरावबाबा आत्राम, अन्न व प्रशासन मंत्री कॅबिनेट. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार क्रिष्णाजी गजबे, माजी आमदार दीपकदादा आत्राम, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी सभापती नानाभाऊ नाकाडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार सांगतनेचे प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, विदर्भ महिला अध्यक्ष पायल कापसे, विदर्भ सचिव अनिल गुरनुले, विदर्भ संघटन प्रमुख राम लांजेवार, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व पद्धधिकारी व सत्कार मूर्ती मोट्या संकेत उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी केले आहे.