– नागुलवाही येथे कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : युवकांनी खेळाला महत्त्व देऊन त्यामध्ये करिअर घडविले पहिजे. खेळामुळे शारीरिक व बौद्धिक पातडीमध्ये वाढ होत असते, असे प्रतिपादन आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.
मुलचेरा तालुक्यातील नगुलवाही येथे आदिवासी विद्यार्थी संघ रबरी बॉल क्रिकेट क्लब नागुलवाही यांच्या वतीने भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांचे गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य रॅली काढून जंगी स्वागत केले. तसेच मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रा. पं. येल्लाच्या सरपंचा वैशालीताई सोयाम तर प्रमुख अतिथी म्हणून चोडमपल्लीचे पारंपारिक इलाका अध्यक्ष कालिदास कुसनाके, मच्छीगठ्ठा येथील माहिती अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ता काशिनाथ मडावी उपस्थित होते. यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, रेणुका वेलादी, मयुरी मडावी, काशिनाथ मडावी, गंगाराम मेश्राम, अर्चनाताई वेलादी पो. पाटील, बालाजी सिडम पेसा अध्यक्ष, रुचाताई मडावी, वैकटेश धांनुरकर, शंकर रामटेके, दिनेश मडावी, आशाताई उराडे, बिचू आलाम पेसा अध्यक्ष मरपल्ली टोला, आनंदराव रामटेके रोजगार सेवक, किर्तीवंतराव सिडाम सह आ. वि. स. तथा अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






