Home गडचिरोली आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते हनुमान वार्डात रस्ता व नाली बांधकामाचे...

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते हनुमान वार्डात रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन

125

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक हनुमान वार्ड प्रभाग क्रमांक ९ येथील रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले. सदर रस्ता व नाली बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या रस्ता व नाली बांधकामामुळे या वार्डातील नागरिकांना सुविधा मिळणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी नगर परिषद सभापती वैष्णवी नैताम, शहर महामंत्री तथा माजी मगर परिषद सभापती केशव निंबोड, शहर महामंत्री विनोद देवोजवार, नरेश हजारे, उराडे सर, देवाजी लाटकर, विलास नैताम, विजय शेडमाके, सुचिता विनोद काटवेदिपक बारसागडे, श्याम वाढई यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!