Home गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या ‘निर्धार नव पर्वाचा’ संवाद मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या ‘निर्धार नव पर्वाचा’ संवाद मेळावा

125

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता अभिनव लॉन गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘निर्धार नव पर्वाचा’ जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपालीताई चाकरणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, इतर मागासवर्गीय विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, गडचिरोली जि. प. माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, माजी आमदार हरिराम वरखडे, जि. प. माजी सभापती नाना नाकाडे यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, युवक, महिला, विद्यार्थी व सर्व फ्रंटलच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रा. कॉं.  जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, रा. कॉं. महिला अध्यक्षा शाहीन हकीम, रायुकॉं जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम यांनी केले आहे.

error: Content is protected !!