Home गडचिरोली २१ ला आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा

२१ ला आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा

263

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी बचाव कृती समिती गडचिरोलीच्या वतीने येत्या २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये धनदांडग्या, गैरआदिवासी जातीचा असंविधानिकरित्या अनुसूचित जमातीच्या सुचित समावेश करण्यात येऊ नये व शासनाच्या खासगीकरण धोरणाच्या विरोधात तसेच आदिवासी समाजाच्या ज्वलंत समस्या निराकरणासाठी आदिवासींचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन घनश्याम मडावी, माधवराव गावळ, भरत येरमे, प्रशांत मडावी, आनंदराव कंगाले, सदानंद ताराम, विठ्ठलराव गेडाम, देवराव आलाम, नामदेव उसेंडी आदींनी केले आहे.

error: Content is protected !!